चल भिजू पावसात
हरवलेल्या दिवसात.
डबक्यात उडी,
पाण्यात होडी.
गारा वेचू,
चिखलात नाचू.
कोसळली सर,
पानांवर धार.
हलव ते झाड,
थेंबांना सांड.
ओला मन शिंगा मोडून
जाउन बसे वासरात.
चल भिजू पावसात,
ओल्या चिंब दिवसात.
मातीचा गंध,
गाण्याची धुंद.
ओढ्याची ओढ,
भिजायची खोड.
ढगांचा ढोल,
वारयाशी बोल.
कडाडली वीज,
तरीपण भीज.
डोक पुसत आई म्हणेल,
कारे भिजला पावसात ?
-निखिलेश बागडे
इकडे पाऊस म्हणजे मुंबईत तुफान लागलाय... अगदी ठाणे आणी त्याच्या पल्याडही... म्हणून आफिसात बसून पावसाची गाणी शोधत होतो नेटवर... तर तुमचा ब्लॉग समोर आला... एकदम एवढी गाणी तीही बरीच मनाला भावलेली एकत्र पाहून गंमत वाटली... सागरचाही ब्लॉग चांगला आहे.
ReplyDeleteशैलेंद्र शिर्के