Showing posts with label Garwa. Show all posts
Showing posts with label Garwa. Show all posts

Wednesday, June 9, 2010

रिमझिम धून

रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन

वार्याेत गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्यातत आता, सुरात तुला मी कवळून

पाऊस पडून गेल्यावर

पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्याड, विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा

पहिला पाऊस

पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण

Tuesday, June 8, 2010

गारवा

ऊन जरा जास्त आहे, दरवर्षी वाटतं..
भर ऊन्हात पाऊस घेऊन, आभाळ मनात दाटतं..
तरी पावलं चालत राहतात, मन चालत नाही,
घामाशीवाय शरीरामध्ये कुणिच बोलत नाही..
इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो,
ऊन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो..
वारा उनाड मुलासारखा सैरवैरा पळत राहतो,
पाना-फुला-झाडांवराती, छपरावरती चढून पाहतो..
दुपार टळुन संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ,
ऊन्हामागुन चालत येते गार गार कातार वेळ..
चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो..
पावसा आधीच ढगांमधे कुठून गारवा येतो?

गारवा.. वार्‍यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा..
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा

गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सर सर सर काजवा नवा नवा
प्रिये मनातही ताजवा नवा नवा

आकाश सारे माळून तारे
आता रूपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा..

गीत - सौमित्र
संगीत - मिलिंद इंगळे
स्वर - मिलिंद इंगळे